


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
सिरोंचा (प्रतिनिधी )
जिल्ह्याचा दक्षिण टोकावर असलेल्या सिरोंचा येथील नगर पंचायत उपध्यक्ष बबलू पाशा यांनी आज शिष्टमंडळ घेऊन गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या भेट घेतली आहे.
या भेटी दरम्यान नपं उपध्यक्ष बबलू पाशा व सिरोंचा काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या भेट घेऊन सिरोंचा शहरातील विविध समस्यावर चर्चा केले यामध्ये प्रामुख्याने शहरातील आरोग्य, शिक्षण व रस्ते संबधीवर चर्चा करण्यात आली.यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष जवाजी यांनी सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर गावातील पाणी समस्यावर चर्चा केले आहे.
यावेळी सिरोंचा नगर पंचायत उपध्यक्ष बबलू पाशा, सिरोंचा काँग्रेस कॉमेटी तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला,नागेश दुग्याला,प्रणित मारगोनी, शैलेंद्र मूत्याला, हिमांशु आडेपू, राहुल गारपेलीवार उपस्थित होते.
कलेक्टर आंबा ठरला चर्चेतील महत्वाचा दुआ
सिरोंचा नपं उपध्यक्षा बबलू पाशा यांनी शिष्ठामंडळासह गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तालुक्यातील कलेक्टर आंबा संदर्भात चर्चा केली सदर आंब्याला उत्तम बाजारपेठ उपलब्ध झाल्यास येथील शेतकऱ्याचे आर्थिक उन्नती साधाता येईल. असा विश्वास बबलू पाशायांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटवस्तु म्हणून कलेक्टर आंबा दिला. त्यामुळे सदर कलेक्टर आंबा जिल्हाधिकाऱ्यांचा चर्चेत महत्वाचा दुआ ठरला.