झिंगानूर, रेगुंठा परिसरात वीज-पाणी समस्या गंभीर -समस्या तत्काळ निकाली काढण्याची सतीश जवाजी यांची मागणी

125

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या रेगुंठा व झिंगानूर परिसरात मागील अनेक वर्षापासून वीजेसह पाण्याची समस्या कायम आहे. मात्र प्रशासनाच्या अनास्थेळेमुळे ही समस्या अधिकच गंभीर बनतांना दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाप्रती स्थानिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. परिणामी संबंधित विभागाच्या अधिकारींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी कॉंग्रेस कमिटी सिरोंचा तालुकाध्यक्ष सतीश जवाजी यांनी केली आहे.
तालुक्यातील रेगुंठा क्षेत्रात मागील 3 ते 4 दिवसांपासून पंधरा गावात पूर्णपणे विद्युत खंडित आहे. विद्युत विभागचा दुरुस्तीचे कामे कासव गतीने चालू असुन या भागातील नागरिक गंभीर समस्याने समोर जात आहेत. सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा व झिंगानूर तसेच अनेक गावे पाणी टंचाईला तोंड देत आहेत. शासनाने सौर ऊर्जेवर आधारित ‘हर घर जल’ लघु नळ पाणीपुरवठा योजनेतून प्रत्येक घरी पाणीपुरठा करण्याच्या उद्देशाने यंत्र बसविले. मात्र सदर यंत्रात तांत्रिक बिघाड असल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प पडली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक ठिकाणी नळ योजना कुचकामी ठरली असल्याचे चित्र कायम आहे. संबंधित विभागाचा अधिकारी, कंत्राटदारांच्या दुर्लक्षितपणामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाणीसाठी 5-6 किमीची पायपीट करीत नदीतून बैलबंडीचा वापर करीत अथवा पायी चालित पाणी आणावे लागत आहे. मात्र प्रशासकीय स्तरावरुन कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र आक्रोश व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिका-यांनी उपाययोजना करीत नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सतीश जवाजी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here