लॉयड्स मेटल सुरजागडच्या वतीने हेडरी येथे जागतिक योगा दिवस साजरा.

138

एटापल्ली (प्रतिनिधी )लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन,लोह खनिज खाण सुरजागडच्या वतीने मौजा हेडरी येथील निसर्गरम्य वातावरणात अससेल्या परिसरातील पटांगणात जागतिक योगा दिनाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन के.सत्याराव,साई कुमार,अरुण रावत,शेट्टी,राज्या,यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाला लोकांना ने-आन करण्या करिता बस सेवा पुरविण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रशिक्षक संगीता मॅडम सदर कार्यक्रमाला 1200 च्या अधिक लोक या कार्यक्रमात सहभाग घेवुन जागतिक योगा दिवसाचे आनंद घेतले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व लोकरिता नाष्टा, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केलेली होती.
सर्वांना आजच्या योगा दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होवून आनंद झाल्याने सर्वांनी आयोजक लॉयड्स मेटल अँड लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी योगा प्रशिक्षक मा. संगीता मॅडम, सहाय्यक प्रशिक्षक अरविंद सर सर यांचं शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन,लोह खनिज खाण सुरजागड च्या टीम नी भरपूर मेहनत घेत कार्यक्रमाला यशस्वी केली. सर्वत्र या कार्यक्रमाची चर्चा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here