


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा(प्रतिनिधी)येथील ग्रामीण रुग्णालयात दहा दिवसांपूर्वी अंकुलू जोडे नावाचे निराधार रुग्ण रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मृतक निराधार असल्याची माहिती प्राप्त होताच मुलकला फाऊंडेशनचे प्रमुख सागर मुलकला यांनी मृतकाचे नातेवाईकाना भेटून मृतदेह स्वगावी नेण्यासाठी व अंत्यसंस्कारासाठी मदत केली. तर नप उपाध्यक्ष बबलू पाशा यांनीही रुग्णवाहिका उपलब्ध करुन मदतीसाठी पुढाकार घेतला.
अंकुलू जोडे हा मृतक अज्ञात व निराधार असल्याने त्याचे कुटुंबातील कोणीही नसल्याने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिका-यांनी या मृत्यूची माहिती सिरोंचा पोलिस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी तालुक्यात नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे मूलकला फाउंडेशनचे प्रमुख सागर मुलकला यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. तत्काळ सागर मुलकला यांनी मृतकाचे नातेवाईकाना भेटून मृतदेह स्वगवी नेण्यासाठी व अंत्यसंस्कारासाठी मदत केली. मृतदेह नेण्यासाठी नगरपंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी स्वर्गरथ उपलब्ध करून दिली. यात सिरोंचा पोलिसांचेही सहकार्य लाभले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, मूलकला फाउंडेशनचे कार्यकर्ते राजकुमार मूलकला, गणेश संड्रा, आणि मृतकांचे नातेवाईक उपस्थित होते.