


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
वार्ड चलो.. पंचायत चलो. अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्हा युवा कांग्रेस प्रभारी पुशपेंद्र शाहू (बिलासपूर छत्तीसगड ) यांनी आज सिरोंचा तालुका दौऱ्यावर आले असून शाहू यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा तालुक्यातील नडीकुडा,मुकीडीगुट्टा, टेकडा मोटला,असरअल्ली गावातील कांग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतले.
कांग्रेस पक्षाचे विचार तसेच पुढील प्रचार कार्यक्रमा बाबत विविध माहिती दिले व येत्या निवडणूकीच्या तयारी बाबत आढावा सुद्धा घेण्यात आले.
यावेळी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष सतीश जवाजी, कांग्रेस जेष्ठ नेते एम.ए.अली, अनुसूचित सेल अध्यक्ष सारया सोनारी, रमेश तैनेनी आसरल्ली सरपंच, रामचंद्र गोगुला उपासरपंच टेकडा मोटका, महेश तलांडे, रामबाबू सग्गेम,सागर कोटरी,कोंडागोर्ला, अशोक कावेरी, शशिकुमार कावेरसह आदी कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.