



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )- पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत येत असलेल्या ग्रापं वेंकटापूर हद्दीतील वेंकटापूर गावात नवीन ग्राम सचिवलायची उदघाटन माजी ग्राम पंचायत सदस्य अंकुलू जनगाम यांच्या हस्ते करण्यात आली.
माजी सभापती जयसुधा जनगाम जिल्हा परिषेत महिला व बाल कल्याण सभापती असताना सदर नवीन ग्राम सचिवलयासाठी प्रस्ताव सादर करून वेळोवेळी पाठपुरावा करून ग्राम पंचायत वेंकटापूर ला नवीन ग्राम सचिवलाय इमारत मंजुरी आणल्याने ग्राम वेंकटापूर हद्दीतील नागरिक माजी सभापतीच्या अभिनंदन करून आनंद व्यक्त केले आहे.
यावेळी भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमात काँग्रेस नेते बानय्या जनगाम व सरपंच अजय आत्राम यांनी उपस्थित नागरिकांना गावाच्या विकासासाठी कश्या पद्धतीने अरखाडा तयार करता येईल यावर मोलाची मार्गदर्शन केले.
यावेळी माजी ग्रापं सदस्य अंकुलू जनगाम,काँग्रेस नेता बानय्या जनगाम, सरपंच अजय आत्राम,उपसरपंच मंजुळा दीकोंडा,ग्रापं सदस्य तुळशीराम गुरुनूले,पेंटीताई तलांडी,श्रीनिवास दीकोंडा, सडवली कारस्पल्ली, ब्राम्हय्या कावरे,तंटामुक्ती अध्यक्ष केशव मडावी,श्रीनिवास घोडाम, राजू गोदारी,रमेश आसाम,देवराज अल्लूरी,अविनाश कुम्मरी,सत्यम मोरला, दिनेश मडावी,रामा तलांडी,संगणक चालक रोहन अल्लूरी, शिपाई चंदू कोटरंगी, रोजगार सेवक रमेश जुनघरी,ग्रापं सहाय्यक रमेश बेडकीसह ग्राम पंचायत वेंकटापूर हद्दीतील चार गावातील नागरिक व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.