


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )नगर पंचायत च्या ताफ्यात आता नवीन वाहनाचे आगमन झाले आहे .शहरातील दूर भागात, गल्लीबोळात आणि अरुंद रस्त्यावर आग लागल्यास अन्य अग्निशमन वाहन मोठे असल्यामुळे तेथे जाता येत नाही. मात्र, आता अग्निशमन वाहन अरुंद रस्त्यावर आणि गल्लीबोळात देखील प्रवेश करेल. यासाठी सिरोंचा नगर पंचायत येथे( fire bulet)फायर बुलेट दाखल झाली आहे.
सिरोंचा नगरपंचायत हद्दीमध्ये एक बुलेट देण्यात आली आहे. अग्निशमन अधीक्षक सोनू झरेकर यांनी या बाबतची माहिती दिली. कमी वेळेत अरुंद रस्त्यावरील किंवा मोकळ्या जागेत सहजतेने धाव घेऊन बुलेट मोठ्या आगीवर नियंत्रण आणेल. या बुलेटवर अग्निशमनचे आवश्यक साहित्य असून पाण्याचे सुद्धा टाकी बसविण्यात आलेली आहे. पाण्याची टाकी 30 ते 35 लिटर क्षमतेची आहे.प्रत्येक फायर बुलेटमध्ये दोन फॉगिंग सिलिंडर आहेत, ज्यांची क्षमता 9 लिटर असून त्यांचे दाब 392 हॉर्स पॉवर आहे. याशिवाय, प्रत्येक फायर बुलेटमध्ये प्रथमोपचार किटही उपलब्ध आहे. प्रत्येक फायर बुलेटवर दोन अग्निशमन कर्मचारी तैनात असतील. या उपक्रमामुळे अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण होईल आणि आग लागल्याच्या घटनांना प्रतिसाद देण्याचा वेळ कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
शहरातील प्रत्येक गल्लीत फायर बुलेट सहजतेने जाऊन 15 मीटरपर्यंत पाण्याचा मारा करू शकते. या बुलेटवर बसलेल्या कर्मचार्यांनी अग्निशमन प्रशिक्षण घेतले आहे. शहरातील आगीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. नगर पंचायतीला मोठी अग्निशमन गाडी दिली असली तरी. त्या गाड्या नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये दाट वस्तीच्या भागात पोहचत नाहीत. त्यामुळे मोठ्या आगीवर नियंत्रण आणण्यास अडचणी येत होत्या. आता या बुलेटमुळे शहरातील अग्निशमन व्यवस्थेत वाढ होणार आहे. प्रत्येक गल्लीत आणि नगर पंचायतीच्या हद्दीतील आगी आटोक्यात ठेवता येईल.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुठेही आग लागल्यास नगर पंचायत येथे संपर्क करावे. त्यानंतर आग विझवण्यासाठी ताबडतोब प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह फायर बुलेट घटनास्थळी पाठवण्यात येईल.
नगर पंचायत उपाध्यक्ष बबलू भाऊ पाशा