


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा – पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन आपल्या भागाची विकास कोण करू शकेल यावर विचार करून सिरोंचा शहारासह तालुक्याची विकासासाठी नेहमी समोर असणाऱ्या युवा नेतृत्व अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय भावी आमदार भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर ) यांच्या नेतृत्वावर विश्वास करून सिरोंचा शहरातील अनेक युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )गट पक्षात प्रवेश केले असून प्रवेश केलेल्या सर्वांना पक्षाचे दुप्पाटा टाकून स्वागत केले आहे.
प्रवेश केलेल्या युवामध्ये सलाम शेख, इरसाद सय्यद ,इस्माईल शेख,साबीर शेख, मुनीफ शेख, समशेर शेख, इरफन शेख, मुंतू शेख, फिरोज शेख,अब्बास शेख,साहेब हुसेनसह सिरोंचा शहारातील अनेक युवकांनी प्रवेश केले आहे.
आम्ही पक्षा प्रवेश केले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर )(तुतारी) चिन्हासाठी आम्ही एकनिष्ठतेने काम करू आणि भरघोस मताने विजयी करू असे वचन दिले.