


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील मद्दीकुंटा गावातील 25 ते 30 युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शाप ) पक्षाचे अधिकृत उमेदवार मा. भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर ) याच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षात प्रवेश केलेल्या सर्व नवनियुक्त सदस्यांना मा ऋतुराज हलगेकर यांनी पक्षाचे दुप्पटा टाकून स्वागत करून सगळ्यांना पार्टीचे सदस्यत्व दिले.
ऐन निवडणुकीच्या समोर तालुक्यातील इतर पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस (शाप ) पक्षात प्रवेश होत असल्याने पक्ष मजबूत होत असल्याची चिन्हे दिसत असून अहेरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )पक्षाचे पारडे जड होताना दिसत आहे.