


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) सिरोंचा नपं शहराच्या विकासासाठी नेहमी पुढे राहत असून आज शहराच्या विविध वॉर्डात रस्ता,नाली, सीडी वर्क व इतर विकास कामे जोराने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांना मिळाला दिलासा आहे.
नगर पंचायतचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली असून सिरोंचा शहरातील नागरिक आनंद व्यक्त करत आहेत.
याप्रसंगी नगरसेवक इम्तियाज खान, अहमद अली, जाहीर शेख, पाणी पुरवठा सभापती नरेश आलोणे,पोचम आकुदारी, जाहीर शेख, रफीक शेख, कलाम हुसेन, सय्यद सलाम, नाजीम शेख, राजेश बंदेला, प्रणित मारगोनी उपस्थित होते.