न. प. उपाध्यक्षा(NP voice president) बबलू पाशांनी दिला सर्वधर्म समभावाचा संदेश -हनुमान मंदिरातील (Hanuman Temple) बोअरवेल भूमीपूजनाला दर्शविली उपस्थिती

307

तिरुपती चिट्याला
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
सिरोंचा(प्रतिनिधी)
नगर उपाध्यक्ष(voice president) बबलू पाशा यांनी वॉर्ड क्रमांक(word no) 16 येथील हनुमान मंदिरात (Hanuman temple)आयोजित बोअरवेल भूमीपूजन सोहळ्यास उपस्थित राहून धार्मिक एकतेचा आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता. या काळात अनेक भक्त हनुमान दीक्षा घेत असतात, आणि अशा वेळी मुस्लिम समाजातील एक नेता मंदिरात हजेरी लावतो. अशात बबलू पाशां (Babulu pasha )यांनी उपस्थिती दर्शवित सर्वधर्म समभावाचे मूर्तिमंत उदाहरण दिले.
हनुमान मंदिरात पाण्याची टंचाई जाणवत असल्याने भाविक व स्थानिक नागरिकांनी बोअरवेल खोदण्याची मागणी केली होती. याला प्रतिसाद देत नगर पंचायत प्रशासनाने आवश्यक निधी मंजूर करून बोअरवेल उभारणीस सुरुवात केली. भूमीपूजनाच्या शुभमुहूर्तावर नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या हस्ते विधीपूर्वक पूजा करण्यात आली. यावेळी मंदिराचे पुजारी, ग्रामस्थ व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोअरवेलच्या उभारणीमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक सुलभ होणार आहे.
बबलू पाशा हे त्यांच्या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदू स्मशानघाट हे बहुप्रतिक्षित कार्य पूर्णत्वास आले त्यामुळे हिंदू बांधवांना अंत्यविधी पार पडणे सोयीचे झाले तसेच सिरोंचा मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी ते शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
बबलू पाशा यांचा हा उपक्रम निश्चितच धार्मिक सौहार्द वाढवणारा आणि सर्वधर्म समभावाचा एक आदर्श ठरणार आहे. यावेळी मारोती गणपूरपु, सुरेश पडिगेला, सीतापती गट्टू, जयेंद्र श्रीपती ,रामू बोंगोनी समस्त भक्तगण व नागरिक उपस्थित होते.

लवकरच मंदिर परिसराचा विकास साधणार-
बोअरवेल भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी सर्वधर्मीय मंदिर ठरलेल्या हनुमान मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याने न. पं. उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी यावेळी सांगितले. हनुमान मंदिर परिसराच्या विकासासाठी लवकरच सिमेंट काँक्रीट रस्ता, विद्युत रोषणाई आणि बैठकीसाठी खास जागा निर्माण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here