


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) तालुक्यातील किष्टय्यापल्ली येथील गोंडवाना क्रिकेट क्लब किष्टय्यापल्ली यांच्या वतीने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
क्रिकेट सामन्याचे उद्घाटन आदिवासी विद्यार्थी संघ सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते बानय्या जनगाम यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी काँग्रेस नेते बानय्या जनगाम यांच्याकडून प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय पारितोषिक राजेश पडालवार कडून तसेच तृतीय पारितोषिक नीलेश मडावी, अमित सनगर, लोकेश हुमने, चंद्रकला सिडाम यांच्याकडून देण्यात आले.
कार्यक्रमाला आविसं कार्यकर्ते अशोक मडावी, राजेश पडला, माजी सरपंच सिंगा मडावी, निलेश सडमेक, लक्ष्मण गावडे, नामदेव तलांडी, जयसुधा जनगाम, सरपंच अजय आत्राम, लक्ष्मण बोल्ले, सुनील आत्राम, रवी गावडे, नितीन सडमेक, चिन्ना मडावी, रवी आलम, समय्या मडावी, श्रीनिवास सडमेक, बाबूराव नीलम, संतोष सिडाम, वसंत मडावी, उपस्थित होते.