


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
सिरोंचा नगरपंचायत हद्दीअंतर्गत येत असलेल्या शहरातील वॉर्ड क्र. 16 मधील रहिवासी गणेश मंचार्ला यांच्या घरास आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक होऊन कुटूंबिय उघडयावर पडले आहे. या गंभीर बाबीची दखल घेत न. पं. उपाध्यक्ष बबलु पाशा यांनी मंचार्ला यांनी घटनास्थळ गाठीत पिडीत कुटूंबाला धिर दिला. तसेच तत्काळ आर्थिक मदत करीत घरकुल मंजूर करण्याचे ठोस आश्वासन दिले. यामुळे लवकरच मंचार्ला परवाराला हक्काचे घर उपलब्ध होणार आहे.
गणेश मंचर्ला हे एक कष्टकरी, सामान्य जीवन जगणारे गृहस्थ असून ते आपल्या कुटूंबियांसह झोपडीवजा घरात राहत होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी शॉर्टसर्किट होऊन या आगीत वर्षानुवर्षे कष्ट करून उभारलेल्या घरासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने एका क्षणात संपूर्ण कुटूंबिय उध्वस्त झाले. या घटनेमुळे मंचार्ला कुटूंबियांवर मानसिक आघात होऊन ते आर्थिक संकटात सापडले होते. घटनेची माहिती मिळताच न. पं. उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी तात्काळ गणेश मंचार्ला यांचे घर गाठित त्यांचे सांत्वन केले. तसेच वैयक्तिरित्या मंचार्ला कुटूंबियांना तत्काळ आर्थिक मदत केली. तसेच नगर पंचायतीच्या वतीने लवकरच मंचार्ला यांना घरकुल योजने अंतर्गत नवीन घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक प्रक्रिया त्वरीत पार पाडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी मारोती गणपूरपु, सीतापती,जयेंद्र श्रीपती, सुरेश पडिगेला, नागेश दुग्याला, राजेश बंदेला व नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते.