


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
बामणी (प्रतिनिधी )सिरोंचा तालुक्यातील ग्राम पंचायत वेंकटापूर हद्दीतील ग्लासफोर्डपेठा येथे सरपंच अजय आत्राम यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन करण्यात आली.
सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा गावात प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमारत जीर्णअवस्थेत असल्यामुळे गावातील नागरिकांना दवाखान्यात उपचार घेताना धोका असल्याची माहिती मिळाल्याने ग्राम पंचायत वेंकटापूरचे सरपंच यांनी तात्काळ जुन्या इमारतीची पाडून त्याच जागी नवीन आरोग्य उपकेंद्र मंजुरी करून नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी आज नवीन आरोग्य उपकेंद्राचे इमारती बांधकाम करण्यासाठी भूमिपूजन केल्याने गावातील नागरिकांना नवीन इमारती मिळाली आहे.
सरपंच अजय आत्राम यांच्या प्रयत्नाने ग्लासफोर्डपेठा येथे नवीन आरोग्य उपकेंद्र इमारती होत असल्याने गावातील नागरिकांना आता गावातच आरोग्य सेव भेटते त्यामुळे नागरिक आनंद व्यक्त करत आहे.
यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, सरपंच अजय आत्राम, उपसरपंच मंजूला दिकोंडा,बापू कुम्मरी रोहन अल्लुरी,सडवली करासापल्ली, श्रीनिवास कावरे, रमेश जुनघरी,तिरुपती बोरकुटे, रमेश बेडकी,येराय्या बोगटा,राजन्ना राजारापू,रमेश कावरे, सिनू घोडाम,लसमय्या आसाम,शेखर जुनघरी, मुत्तीराव अल्लूरी,राजेश पडाल,सुमन अल्लूरी,राजेश दुर्गम,लाचय्या कावरे,लिंगाय्या अल्लूरीसह ग्लासफोर्डपेठा गावातील समस्त गावाकरी उपस्थित होते.