


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी )अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते सिरोंचा तालुक्यात विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या प्रयत्नातून कारसपल्ली ते सिरोंचा पर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल तीन किलोमीटरचा रस्ता मंजूर करण्यात आला. २९ एप्रिल रोजी आमदार धर्मराव बाबा आत्राम सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन केले. यावेळी अहेरीचे माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सिरोंचा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश रचार्लावार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच गावकरी उपस्थित होते.
मागील काही वर्षांपासून नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानीकांनी रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे केली होती. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आ. धर्मराव बाबा आत्राम यांनी मोठी निधी खेचून आणली. अखेर सदर रस्त्याचे भूमिपूजन झाले असून लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांची मोठी अडचण दूर होणार असल्याने परिसरातील नागरिकांनी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे आभार मानले.