



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी) सिरोंचा येथे भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाले यावेळी दहावी मध्ये तालुक्यातून प्रथम *कु. वैष्णवी तिरुपती पोट्टाला ९२. ४०टक्केवारी* द्वितीय *अलेक्या जनक काळबाजीवार ९१. ६० टक्के* तसेच *साहिल दीपक कन्नमवार९१. ०० टक्के*, *कु. श्रीनिधी लचूलू पोट्टे ९०. ६०टक्के प्रणाली वेंकटेश तोकाला ८८. ८०, श्रीजा रामरेड्डी कुंदेना ८८. ८०, हिरण्या शाम व्यास ८०. ६० तसेच १२वी मध्ये *सोमशेखर गोगु ८१. ६० टक्के, कोमल जयंत मांडवे ७५. १७ व शशांक विजय बुद्धावार ७१. ३३* असे सिरोंचा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे आई वडील यांचे शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन त्यांचे गौरव भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
विशेष म्हणजे ताई प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पुढील कोणत्याही शैक्षणिक स्तरावर माझी मदत लागत असेल तर अवश्य मला संपर्क करा अशी ग्वाही देत ताईंनी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले यावेळी सोबत नगरसेवक रंजीत गागापुरवार, नगरसेविका सपना तोकला, करुणा जोशी, राजेश बद्दी,मयुर पुप्पालवार आदी उपस्थित होते.