



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी ) तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (अजित पवार) गटाकडून पुन्हा एकदा मधुकर कोल्लूरी यांनाच तालुका अध्यक्ष पद मिळाला आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून ते या पदावर कार्यरत आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या विघटन होण्या पूर्वीपासून मधुकर कोल्लूरी हे या पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि राज्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे दोन गट निर्माण झाल्यानंतर देखील अजिद पवार गटाकडून मधुकरकोल्लूरी यांनाच पद मिळाले होते. नुकतेच 21 तारखेला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून राज्यात तालुका अध्यक्ष निवडण्यात आले त्यात देखील पुन्हा एकदा सिरोंचा तालुका अध्यक्ष म्हणून मधुकर कोल्लूरी यांची निवड झाली आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी मधुकर कोल्लूरी यांचे अभिनंदन केले आहे.