सिरोंचा तालुक्यातील अमरावती येथील धान खरेदी केंद्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान(member Of Parliament. Dr.Namdev Kirsan) यांच्या हस्ते उद्घाटन

85

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान(MP Dr.Namdev Kirsan) यांनी सिरोंचा तालुक्यातील अमरावती(Amravati) गावाला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधन्या बरोबरच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या शासकीय धान खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमी भाव आणि विक्रीसाठी अधिक सुलभ व्यवस्था मिळणार आहे. धान खरेदी केंद्रावरील धनाची उचल भरडाई करिता झाली नसल्याने धान खरेदी बंद होती मात्र स्थानिक गरज लक्षात घेता हे केंद्र सुरू करण्यात आले असून, यामुळे शेतकऱ्यांना लांब प्रवास न करता आपल्या गावाजवळच धान विक्री करता येणार आहे.
या कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, माजी प. स. सदस्य हर्षवर्धन आत्राम, DCC बँक उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मल्लिकार्जुन, नगराज इंगिली कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, उप सरपंच अशोक हरी, गौरव येणप्रेडीवार, विपुल येलटीवार यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार डॉ. किरसान(MP Dr.Namdev Kirsan) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे. हे धान खरेदी केंद्र हे केवळ एक सुविधा केंद्र नसून, शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरेल.”

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आणि शेतकरी बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले. उद्घाटन सोहळ्यानंतर शेतकऱ्यांनी खासदार डॉ. किरसान यांचे आभार मानत केंद्र सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल आणि त्यांना आपला माल विक्रीसाठी दूर जावे लागणार नाही, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here