


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे आमदार विजयभाऊ वड्डेटीवार यांना आदिवासी विध्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी नुकत्याच भेट घेत तालुक्यातील प्रलंबित समस्यांवर चर्चा घडवून आणली.
या चर्चेदरम्यान आविसंचे तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम यांनी विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वड्डेटीवार यांच्या सोबत सिरोंचा तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा घडवून आणित प्रलंबित समस्या तत्काळ मार्गी लावण्याची विनंती केली.
यामध्ये प्रामुख्याने सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे कामासंदर्भात,तालुक्यातील आरोग्य समस्यावर, रिक्त पदे, वन हक्क पट्टे संदर्भात, तालुक्यातील कोर्ला, कोप्पेला परिसरातील विद्यूत समस्या, रस्ते, पाणी, आदी समस्या तत्काळ सोडविण्यात यावे, यासोबतच तालुक्यातील दुर्गम भागातील विविध प्रलंबित समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती विजयभाऊ वड्डेटीवार यांचेकडे केली.यावेळी विरोधी पक्ष नेते वड्डेटीवार यांनी तालुक्यातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी मंत्रालयात प्रश्न उचलून तसेच समस्याचा पाठपुरावा करून सिरोंचा तालुक्यातील समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.
या चर्चेदरम्यान विरोधी पक्ष नेते, काँग्रेसचे आमदार विजयभाऊ वड्डेटीवार,आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम होते.