स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या पदाधिकाऱ्यानी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची घेतली भेट

126

-विदर्भ निर्माण संकल्प मेळाव्याला उपस्थित राहण्याचे दिले निमंत्रण
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहेरी(प्रतिनिधी)स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते तथा माजी आमदार वामनराव चटप यांनी आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या घरी भेट देत 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विदर्भ निर्माण संकल्प मेळाव्याला उपस्थित राहून आंदोलनात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले.माजी आमदार वामनराव चटप यांनी बोलतांना पुढे म्हटले की आपण विद्यार्थी दशेपासून आंदोलन करून वेगळा विदर्भाची मागणी करत आहात म्हणून आता होणाऱ्या आंदोलनात आपण सक्रिय सहभाग घेण्याची वेळ आली आहे,आंदोलनाशिवाय विदर्भ वेगळा होणे नाही.त्या सोबतच अहेरी उपविभागातील समस्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आस्वासन देऊन होणाऱ्या विदर्भ निर्माण संकल्प मेळाव्यासाठी आर्थिक मदत दिले.
सदर भेटी दरम्यात माजी आमदार वामनराव चटप यांच्या सोबत मुकेश मासुरकर,तात्यासाहेब मत्ते,अशोक पोरेड्डीवार, विलास रापर्तीवार,मोतीराम लाटेलवार,दिनकर लाकडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here