


रानटी हत्ती व वाघांच्या दहशतीमुळे शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरीक हवालदिल झाला असून वाघांच्या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे रानटी हत्तींसह नरभक्षी वाघांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिका-यांमार्फत वनमंत्र्यांना सादर करण्यात आले.
जंगली हत्ती आणि वाघाच्या हल्ल्यात रोज निरपराध लोकांचे बळी जात आहेत. शेती आणि घरांची प्रचंड नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याने नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे जंगली हत्ती व नरभक्षी वाघांचा ड्रोन सर्वेक्षण करून तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, हत्ती, वाघ किंवा अन्य कोणत्याही वन्यप्राण्याच्या हल्यातील जखमी व मृत व्यक्तीच्या कुटुंबास तातडीने भरीव आर्थिक मदत करावी, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या शेती आणि घराचे पंचनामे करून कुठल्याही जाचक अटी न लादता सरसकट मदत करावी, वनपट्ट्याचे प्रलंबित मागण्या निकाली काढून वनपट्टे व सातबाऱ्याचे वितरण करण्यात यावे यासह अनेक मागण्यांना घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांचे मार्फत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, आदिवासी सेल अध्यक्ष छगन शेडमाके, अनु. जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, शंकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.